Saturday, May 16, 2026

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

उत्पन्न वाढेल

मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहे, त्यामुळे धावपळही वाढणार आहे. खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांना ही काम खूप वाढणार आहे, त्यामुळे परिवाराकडे लक्ष कमी दिले जाईल. यामुळे घरातील वातावरण आपणास चांगले ठेवावेच लागेल. घरातील व्यक्ती नाराज असतील.कुटुंबातील व्यक्तींना खूष करण्यासाठी एखादी छोटी-मोठी सहलीचे आयोजन कराल. प्रकृती स्वास्थ्याकडे चांगले लक्ष दिल्यामुळे प्रकृती नीट असेल .प्रेमी प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्यापासून दक्ष राहणे, कुठल्याही परिस्थितीत भावनांचा विचार करणे आवश्यक आहे.व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील उत्पन्न वाढेल उलाढाल वाढेल व्यवसायिक केलेली नवीन बदल व्यवसायात नवीन वातावरण घेऊन येतील. जूनी व्यावसायिक येणी वसूल होतील..विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

प्रवासाची शक्यता

वृषभ : कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ-बहीण यांच्या संबंधात काही गोष्टी मध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे.एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपणावर सोपवण्यात येणार आहे. .त्या मुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये प्रवासाची शक्यता आहे प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेणे. स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले.कोणाशी वाद होऊ देऊ नका.घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता.आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला जास्तीचे काम करावे लागेल विशेषतः सरकारी नोकरीत आपल्या अधिकार कक्षा रुंदावतील. अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता. मात्र आपण आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन कार्य करावे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

व्यवहारात पारदर्शकता ठेवावी

मिथुन : आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी आपला बराच खर्च होण्याची शक्यता आहे.स्वतःच्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. .ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट आहे त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी, तरच त्यांना चांगले लाभ होऊ शकतात. शेअर मार्केट मधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत. त्या दृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल.नोकरी करणार्‍या व्यक्तीं मध्ये आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने त्याचा त्यांना चांगला लाभ होईल.नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्याचा गौरव होईल पदोन्नती अथवा वेतन वृद्धि मिळण्याची शक्यता मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील मुला-मुलींच्या कडून त्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी चांगल्या बातम्या कानावर येतील त्यामुळे घरातील वातावरण उत्साहजनक राहील.  

सामंजस्याने प्रश्न सोडवा

कर्क : आपल्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे,अब आवश्यक खर्चास कात्री लावणे हितकारक ठरेल कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागेल.राहत्या घरात भौतिक सुख सुविधा वाढविण्या करता खर्च होऊ शकतो आपल्या जीवनशैलीतही मोठे चांगले बदल होण्याची शक्यता आहे. महिलांचे आपल्या जोडीदारावर बरोबर वाद विवाद होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद पेक्षा बसून चर्चा करून आपले प्रश्न सोडवा.सामंजस्याने प्रश्न सोडवा अन्यथा आपल्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.मुलांनी मैदानी खेळ खेळताना सावध असावे पडणे झडणे असे होऊ शकते छोट्या-मोठ्या जखमा होऊ शकतील त्यामुळे सावध असावे.नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणात पडू नये.प्रेमिकांना हा कालावधी चांगला.प्रवासाचे योग आहेत मात्र प्रवास करताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण अत्यावश्यक ठरेल इतरांशी स्पर्धा टाळा. प्रवास कार्य सिद्ध होतील.  

नवीन संधी प्राप्त होतील.

सिंह :आपल्या जिद्दीने,व चिकाटीने आपण आपल्या कार्यात सफलता मिळवणार आहात. व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील.मात्र संधीचे सोने करणे आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे इतरांची वाद-विवाद टाळणे क्रमप्राप्त ठरेल सामाजिक कार्य रस घ्याल. जे जातक नोकरी करत आहे त्यांना सुद्धा नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश मिळणार आहेएखादी मोठी नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. शिक्षण वाढवण्याच्या दृष्टिकोनातुन आपली वाटचाल सुरू राहील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉमर्सचे विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होणार आहे. आपल्या लोकप्रियतेमुळे आपला मित्रपरिवार वाढणार आहे.मित्रमंडळींबरोबर मनोरंजन आणि आनंद वाढवण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.यातून आपणास भरपूर उत्साह व शक्ती प्राप्त होईल. यशाची वाटचाल सुरूच राहील. ज्या तरुण-तरुणींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होत होते त्यांचे विवाह ठरतील .प्रेमामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आरोग्याचे प्रश्न संपुष्टात येतील.

भाग्योदय होतील

कन्या : वैयक्तिक प्रगती कारक कालावधी आहे.स्वतःच्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न साकार होऊ शकते त्याचप्रमाणे जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल नोकरीत सुरुवातीस ताण-तणाव जाणवण्याची शक्यता आहे हीत शत्रू वाढण्याची शक्यता आहे.नवपरिणीतांचे भाग्योदय होतील घरात मंगल कार्य ठरतील मात्र काही घटना विचित्र पद्धतीने होऊ शकतात सावध राहणे चांगले कोर्ट कचेरीची प्रकरणी समोर येण्याची शक्यता आहे आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होईल हा कालावधी महिलांना शुभ राहील आर्थिक दृष्ट्या प्रगती होताना दिसेल जुन्या गुंतवणुकीतून भरघोस लाभ होईल प्रॉपर्टीची काही कामे थांबली असतील तर ती गतिशील होती कुटुंबामध्ये सामंजस्याचे वातावरण राहील आपल्या विचारांमध्ये परिपक्वता येताना दिसेल मात्र आपण धैर्याने आणि संयमाने आपले कार्य पूर्ण केल्यास हिताचे ठरेल ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल.

कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल.

तूळ : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील विशेषतः नवीन भागीदारी मध्ये यश संपादन करता येईल नवीन भागीदारी विषयी विचारणा होण्याची शक्यता मात्र स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक राहील कुटुंबातून विसंवाद दूर ठेवावे जीवनसाथी बरोबर वादविवादाची शक्यता विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत त्याबाबतीमध्ये जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल आपण आपल्या लक्षा वरती लक्ष केंद्रित करणे व कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल आयत्यावेळी चा खर्च वाढू शकतो काही कारणांमुळे आपल्या कार्यात अडथळे आले तरी ते अडथळे आपण व्यवस्थित पार पाडू शकाल त्यावर मात कराल आपल्याला भाग्याची साथ मिळेल आपले नियोजन यशस्वी ठरेल विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते चालू नोकरीमध्ये ताणतणाव निर्माण होईल एखादी सुखद बातमी मिळू शकते.

रागावर नियंत्रण आवश्यक आहे

वृश्चिक :आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्तीं बरोबर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहेतसेच आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल आपल्या नोकरीच्या ठिकाणी कामा संदर्भातील ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज आहे.बरोबरील सहकार्‍यांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.. या कालावधीमध्ये शेअर मार्केट पासून आपण लांबच राहावे.नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आपण जर नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा असल्यास, हा विचार काही काला वधीसाठी स्थगित करणे लाभकारक आहे .व्यापार व्यवसायामध्ये दिलेल्या कालावधीमध्येच आपण आपले काम पूर्ण करावे.ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे, नोकरी मिळविण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

वेळेचे नियोजन करणे गरजेचे ठरेल

धनु : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश येण्यासाठी आपणास जास्त कष्ट घेणे, जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेच ग्रहमान आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करा अन्यथा करूच नये .त्यातल्या त्यात शेअर बाजारासाठी तर गुंतवणूक करूच नये.ज्यांना आपली प्रॉपर्टी भाडेतत्वावर द्यायची आहे घर किंवा दुकान त्यांनी लिखापढी नीट कराव्यात कागदपत्रे नीट करावीत.नियम आणि अटी यांचे पालन काटेकोरपणाने करावे.पैतृक संपत्ती मध्ये काही वाद विवाद असतील कोर्टकचेरीची कामे असतील तर ते पुढे ढकलावी.या सप्ताहामध्ये आपण आपल्या सुविधांसाठी नवीन कपडे दागिने खरेदी करण्याकडे लक्ष असेल.आपण आपली गुंतवणूक सोन्यामध्ये कराल.विद्यार्थ्यांनी अपेक्षित यशासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे ठरेल इतरांपेक्षा जास्त प्रयत्न करणे आवश्यक  

आर्थिक लाभाच्या प्रमाणात वाढ

मकर :आपण आपले रहाणी मान उंचवण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च कराल.या कालावधीमध्ये आपले घराचे स्वप्न किंवा दुकानाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत.हे बजेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहेमात्र त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे प्रयत्न सफल होऊ शकतील तसेच मदत मिळेल.नोकरी, व्यापार व्यवसायामध्ये काही नवीन संधी आपणास उपलब्ध होतील.नोकरी व्यवसायातील टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करा.आपल्या कार्यक्षेत्रात आपणास पुर्ण लक्ष द्यावे लागणार आहे.इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतः केलेली बरी सहकार्‍यां सोबत छोटेसे वाद-विवाद मोठे होण्याची शक्यता आहे त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.आर्थिक लाभाच्या प्रमाणात मात्र वाढ होणार आहे.आर्थिक लाभ वाढवण्याच्या दृष्टिकोनात आपण प्रयत्नशील राहाल त्या प्रमाणात जास्त कष्टही कराल.आपण आपल्या जिद्दीने व चिकाटीने यश प्राप्त करालकुटुंब परिवारातील मुला मुलींकडून चांगल्या वार्ता समजल्या मुळे कुटुंबातील वातावरण आनंदी व उत्साही राहील

द्विधा मनस्थिती राहील.

कुंभ : आपण जर कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असाल तर ती संस्था नावारूपाला येईल प्रसिद्धी पावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जर विचार केला तर हा कालावधी आपणास बढती साठी चांगला आहे.किंवा पगार वाढ होऊ शकते.आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते .व्यापार व्यवसायिकांना आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगली संधी आहे.या कालावधीमध्ये आपण घर खरेदी किंवा वाहन खरेदी करू शकता .नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये पडू नये .कौटुंबिक स्तरावर आपली द्विधा मनस्थिती राहील.कुटुंबात थोडेसे वातावरण तणावपूर्णक राहील. मन शांत ठेवून व आत्मविश्वास पूर्वक निर्णय घ्या.कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना गोंधळून जाऊ नका शांतपणे एकाग्रतेने आपल्या समोरील निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. जमीन जुमला मालमत्ता याविषयीचे थांबलेली व्यवहार गतिमान होऊन मार्गी लागतील. मध्यस्थी ओळखी उपयोगी पडून आर्थिक फायदा झालेला दिसेल. उत्पन्नात वाढ होईल.

सहकार्य लाभणार आहे.

मीन :आपले वैवाहिक जीवन चांगले असेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा चांगली असेल वैवाहिक सुख मिळेल. आपण जर एकटे असाल तर आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.आपले आई-वडील किंवा घरातील जेष्ठ व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे.आपले प्रकृती स्वास्थ्य चांगले असले तरीही आपल्याला दक्षता घेणे आवश्यक आहे.नोकरी करणार्‍या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांना बरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात.कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.अतिआत्मविश्वास काही वेळेस घातक ठरतो हे लक्षात ठेवा आपल्या समोरील कोणताही लहान मोठा निर्णय शांतपणे विचार करून घ्या वाहन चालवताना इतरांशी स्पर्धा टाळा. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्व सामान्य राहील.नोकरीमध्ये वरिष्ठांचे संबंध चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
Comments
Add Comment