Baramati Loksabha : EVM वर कमळाचं फूल नाही तर मतदान कसं करायचं?

पुण्यातील मतदार आजोबा संतापले


पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मतदारांचा पार गोंधळ उडवून टाकला आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. त्यामुळे एकाच पक्षाला ठरवून मतदान करणारे पारंपरिक मतदार पुरते गोंधळले आहेत. अशीच एक घटना आज बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात घडली. या ठिकाणी एक मतदार आजोबा ईव्हीएमवर (EVM) कमळ फुलाचं चिन्ह न दिसल्याने चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.


त्याचं झालं असं की, बारामतीची जागा ही महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व त्यांनी या ठिकाणी आपल्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली व सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत आहे. त्यात सुनेत्रा पवार या 'घड्याळ' चिन्हावर तर सुप्रिया सुळे या 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.


अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती असल्याने या ठिकाणी ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नाही. मात्र, पारपंरिकरित्या कमळाला मतदान करत आलेल्या मतदारांचा यामुळे गोंधळ उडाला. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेत एका मतदार आजोबांनी कमळ दिसत नसल्याने आपला संताप व्यक्त केला.


आजोबा म्हणाले, EVM वर कमळ फूल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर त्याला आम्ही काय करणार? कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार? मतदान करायचे आहे पण कमळ फूल कुठे आहे, असं आजोबा म्हणाले. कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबांनी मतदान न करण्याचा निर्धार केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मात्र या आजोबांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत मतदान केले.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह