
शुभ दिवशी सोने खरेदीवर मिळणार 'ही' विशेष सवलत
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते. यादिवशी शुभ कार्याची सुरुवात सोने खरेदी करण्यापासून केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्याने संपूर्ण वर्षभर जीवनात सुख-समृद्धी मिळते, असे मानले जाते. मात्र सध्याच्या घडामोडीत सोन्याच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील मोठमोठ्या ज्वेलरी कंपन्यांनी या खास प्रसंगी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या कंपनीने कोणती व कसली सवलत दिली आहे.
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा हा सण १० मे म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना मेकिंग चार्जेसवर घसघशीत सूट मिळत आहे.
'या' ज्वेलरी ब्रँडतर्फे मिळणार भरघोस सूट
- टाटाचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड 'तनिष्क' या अक्षय तृतीयेला ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. ही कंपनी ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २० टक्के भरघोस सूट देत आहे. ही ऑफर १२ मे पर्यंत असणार आहे.
- मलबार गोल्ड मोठ्या सूट देत आहे. प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड मलबार गोल्ड आपल्या ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २५ टक्के भरघोस सूट देत आहे. कंपनीची ही ऑफर चालू झाली असून १२ मे पर्यंत असणार आहे.
त्यासोबतच, SBI क्रेडिट कार्ड धारकांना २५,००० रुपयांच्या किमान खरेदीवर ५ टक्के कॅशबॅकचा लाभ मिळत आहे. तर ही ऑफर १० मे पर्यंत असणार आहे.
- जॉयलुक्का (Joyalukkas) हा ज्वेलरी ब्रँड अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना विशेष सवलत देत. कंपनीने खास ऑफर लाँच केली आहे. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना १,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर १३मे पर्यंत असणार आहे.
त्याचवेळी, १०,००० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना ५०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर, तुम्हाला २,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर १२ मे २०२४ पर्यंत सुरु असणार आहे.
- तसेच फॅशनेबल ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड मेलोराने हिरे आणि रत्नांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २५ टक्के सूट जाहीर केली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.