'या' तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल...

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आला. या पार्श्वभूमीवर मंडळाने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


देशभरातून तब्बल ३९ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान घेण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये निकालाची तारीख नमूद केलेली बनावट परिपत्रके फिरत असल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे समाजमाध्यमात फिरत असलेल्या निकालाच्या बनावट तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले होते.


या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळाद्वारे संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट तारखांमुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटला आयटीएकडून नोटीस ; उत्तेजक चाचणीत अनउपस्थिती....

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी देण्यासाठी गैरहजर राहिल्याप्रकरणी इंटरनॅशन टेस्टिंग

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एनटीकेएमएचा उपक्रम

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक असणार असून, यासाठी कोट्यवधी रुपयांचा

PM Vishwakarma Yojana : ऐकलंत का ? मोदी सरकार ३ लाख रुपये देतंय, पण कशासाठी ? काय आहे सरकारची योजना ? जाणून घ्या

PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब

Marathi Regional OTT Platform : भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ 'स्टेज' मराठीत दिमाखात दाखल

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील

IPL 2026 : प्लेऑफचे ठिकाण झाले पक्के ; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

बंगळुरुमध्ये एकही सामना नाही...तिकीटेमुळे वाद BCCI UPDATE : आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगामातील अखेरचा साखळी

Riteish Deshmukh Raja Shivaji : तिकीटबारीवर ‘राजा शिवाजी’ची दमदार घोडदौड; 44.40 कोटींचा कमावला गल्ला

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ