Marathi Regional OTT Platform : भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ 'स्टेज' मराठीत दिमाखात दाखल

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील सिनेसृष्टीला सिनेमांचे माहेरघर मानले जाते. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये मराठी मनोरंजन विश्वाचा डंका वाजला असून, मराठी सिनेमांनी जागतिक पातळीवरही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्याच्या डिजिटलच्या युगात मराठी प्रेक्षकांनाही डिजिटल मनोरंजनाची सवय लागलेली असताना सध्याच्या ओटीटी प्लॅटफॅार्मवर दर्जेदार मराठी काँटेंट उपलब्ध होत नसल्याची खंत रसिकांकडून व्यक्त होत आहे. जणू त्यावर रामबाण उपाय बनून भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ 'स्टेज' मराठीत दिमाखात दाखल झाले आहे.


अंधेरीतील वेदा कुणबा थिएटरमध्ये 'स्टेज' मराठीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला 'स्टेज'चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल, स्टेज ओटीटी मराठी कन्टेन्ट हेड राजेश पाठक तसेच मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. कलाकारांच्या मांदियाळीत अनंत महादेवन, चिन्मय मांडलेकर, क्षितीज दाते, श्रेया बुगडे, उर्मिला जगताप, पुष्कर जोग, निशा परुळेकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. यावेळी 'स्टेज' मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या मराठी कलाकृतींची घोषणाही करण्यात आली. 'स्टेज' हे केवळ एक ओटीटी प्लॅटफॅार्म नसून, ही एक क्रांती असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. २०१९ मध्ये स्थापन झालेले 'स्टेज' हे भारतातील पहिले बोलीभाषा आधारित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि गुजराती भाषेत यशस्वी क्रांती केल्यानंतर, 'स्टेज' आता कोट्यावधी मराठी प्रेक्षकांना त्यांच्या मातीतील, त्यांच्या बोलीभाषेतील दर्जेदार आणि कौटुंबिक आशय देण्यासाठी कटिबद्ध आहे.



'स्टेज'चे सह-संस्थापक प्रवीण सिंघल म्हणाले की, आम्ही मराठीत प्रवेश करीत असल्याचा खूप आनंद आहे. कोसाकोसावर पाणी आणि वाणी बदलत जाते. आपल्याला बोलीभाषेतून गोष्टी सांगायला, पाहायला आणि ऐकायला आवडतात. घरी जेव्हा आपण कुटुंबियांसोबत बोलतो तेव्हा कोणताही आडपडदा नसतो. अशाच प्रकारे कोणताही आडपडदा न ठेवता जेव्हा रसिकांशी भेट घेतली जाते तेव्हा त्यात एक आपलेपणा जाणवतो. आपल्या संस्कृतीसाठी काहीतरी करायला हवे या विचारातून आम्ही 'स्टेज'ची स्थापना केली. इतर भाषांमध्ये यशस्वी झाल्यानंतर मराठीपर्यंत पोहोचण्याचा 'स्टेज'चा प्रवास खूप संघर्षमय आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून आमच्या गाठीशी खूप मोठा अनुभव जमा झाला आहे. मराठीमध्ये विपुल कलासंपदा आहे. इथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात चित्रपट बनतात. रसिक ते आवडीने पाहतात. अशा सिनेसृष्टीला आता 'स्टेज'च्या अनुभवाचा फायदा होणार आहे. मराठी सिनेमा आम्हाला घरोघरी पोहोचवायचा आहे. १ मेपासून 'स्टेज' सुरू झाले असून, लवकरात लवकर मराठी रसिकांनी याचे सबस्क्रीप्शन घ्यायला हवे असे आवाहनही प्रवीण सिंघल यांनी केले.


'स्टेज' ओटीटी मराठी कन्टेन्ट हेड राजेश पाठक म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याकडे एक संस्कृती आणि संत परंपरा आहे. खान्देशी, वैदर्भीय, कोकणी, मालवणी, नागपूरी, सातारी, कोल्हापूरी, अहिराणी अशा महाराष्ट्रामध्ये २००हून जास्त बोलीभाषा आहेत. या प्रत्येक बोलीभाषेत नाट्यकला, लोककला, लोकपरंपरा आणि संस्कृती दडलेली आहे. या प्रत्येकाला व्यासपीठ मिळत नाही. आजच्या डिजिटल युगात 'स्टेज' मराठी हे खऱ्या अर्थाने यांना व्यासपीठ देणार आहे. रसिक आणि कला यांच्यात दुवा साधण्याचे काम आम्ही करणार आहोत. मागील काही वर्षांपासून हे व्यासपीठ हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती भाषांमध्ये काम करीत आहे. महाराष्ट्रात खूप साहित्य आहे. त्याला या माध्यमातून संधी मिळणार आहे. रंगकर्मींना सांगायची असलेली गोष्ट मांडण्यासाठी हे व्यासपीठ खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रश्न सोडवण्याचा स्टेज हा एक नवीन पर्याय आहे. रसिकांना दर्जेदार काँटेंट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी रसिक जाणकार असल्याने त्यांना चांगल्याची जाण आहे. याचे भान राखून आम्ही वाटचाल करणार असल्याचेही राजेश पाठक म्हणाले.



'इलू इलू १९९८', 'सखे गं साजणी', 'डेटिंग सेटिंग', 'प्लस मायनस', 'प्रेमाचा तमाशा', 'पहिलं प्रेम', 'माझी वाली लव्हस्टोरी' या 'स्टेज' मराठीवरील कलाकृती रसिकांचे लक्ष वेधणार आहेत. यापैकी 'डेटिंग सेटिंग' या वेब सीरिजसोबतच 'इलू इलू १९९८' व 'सखे गं साजणी' या चित्रपटांची झलकही दाखवण्यात आली. 'डेटिंग सेटिंग'मध्ये क्षितिज दाते आणि श्रेया बुगडे मुख्य भूमिकेत आहेत.

Comments
Add Comment

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या