Riteish Deshmukh Raja Shivaji : तिकीटबारीवर ‘राजा शिवाजी’ची दमदार घोडदौड; 44.40 कोटींचा कमावला गल्ला

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमध्येही चित्रपटाची कमाई स्थिर राहिल्याने निर्मात्यांचा उत्साह वाढला आहे. आता हा चित्रपट वेगाने 50 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत आहे.



‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी तब्बल 4.9 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये हिंदी आवृत्तीमधून 15.5 कोटी तर मराठी आवृत्तीमधून 33.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आले आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण देशांतर्गत कमाई आता 44.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्य दृश्यरचना आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाचे कौतुक होत आहे.


या चित्रपटात जेनेलिया डिसूझा, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि भाग्यश्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील भव्यता आणि भावनिक कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.



दरम्यान, साई पल्लवी आणि जुनैद खान यांचा ‘एक दिन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ 28 लाख रुपयांची कमाई केली असून, एकूण गल्ला 3.51 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिला आहे.तर दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. प्रदर्शनाच्या 19व्या दिवशी चित्रपटाने 22.5 कोटी रुपयांची कमाई केली असून, आतापर्यंतचा एकूण गल्ला 14.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या