मुंबई: फळे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होते. फळांमध्ये ती सर्व पोषकतत्वे असतात जी शरीरासाठी गरजेची असतात. प्रत्येक मोसमात आपापली फळे असतात जे खाण्याचा आरोग्यतज्ञ सल्ला देतात. दरम्यान, फळे खाण्याचेही काही नियम आहेत. ते जर पाळले नाहीत तर त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. यातील एक म्हणजे काही फळे खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नये. जर तुम्ही अशी चूक करत असाल तर यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकते.
सफरचंद
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर फळ आहे. यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जे पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र जर सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर ते फायबर आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच पचनाचे काम व्यवस्थित होत नाही.
कलिंगड
उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. अशातच तुम्ही जर कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिले तर शरीरास नुकसान पोहोचू शकते.
टरबूज
टरबूजालाही उन्हाळ्यात मोठी पसंती दिली जाते. हे रसदायक असे फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र हे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
केळी
केळी खाण्याचे फायदे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. यात हेल्दी फॅट्स, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. मात्र केळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे ब्लड शुगरचा त्रास होऊ शकतो.
जांभूळ
जांभूळ हे अतिशय फायदेशीर आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर आहे. याच्या बियांमध्ये अनेक फायदेशीर गुण लपले आहेत.