Nashik Loksabha : नाशिकची जागाही शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

  95

महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा


नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिकच्या जागेवरुन (Nashik Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपा (BJP) हे तिन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केले. त्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नाशिक येथे महायुतीच्या एकत्र पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.


शिवसेनेकडून आज सकाळीच ठाणे व कल्याण या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकचा प्रश्न सुटला नव्हता. आज पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबतही महायुतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवार करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचा सत्कार केला.





हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

Comments
Add Comment

राज्यात पावसामुळे १० लाख एकर शेती पाण्याखाली - अजित पवार

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मुंबईसह कोकण,

श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १००

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले