Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीCSMT Local : सीएसएमटीजवळ घसरला लोकलचा डब्बा! पनवेलहून आली होती लोकल

CSMT Local : सीएसएमटीजवळ घसरला लोकलचा डब्बा! पनवेलहून आली होती लोकल

वडाळा ते सीएसएमटी वाहतूक बंद

मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरुन (CSMT Station) एक मोठी बातमी समोर आली आहे. पनवेलहून सीएसएमटीला (Panvel to CSMT) येत असलेल्या एका लोकलचा डब्बा रुळावरुन घसरला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे हार्बर लाईनवरील (Harbour Line) वाहतूक सीएसएमटी ते वडाळा (Vadala) दरम्यान दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद झालेली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील वाहतूक सुरळीत असून त्यावर कसलाही परिणाम झालेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ हार्बर लाईनवरुन पनवेलवरुन लोकल दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येत असताना हा डबा घसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

सुरुवातीला हार्बर लाईनवरील काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या गाड्या मशीद बंदर स्थानकापर्यंत आणून प्रवाशांना सोडलं जाईल, अशी माहिती आहे. त्याचवेळी वडाळा स्थानकातून पनवेल, वडाळा कुर्ला आणि वडाळा गोरेगाव अशी सेवा सुरु आहे.

दरम्यान, हार्बर लाईनवर रुळावरुन घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तोपर्यंत हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत राहणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील वेळापत्रक देखील कोलमडणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -