Saturday, December 14, 2024
Homeक्राईमPune Crime : ठेकेदारीच्या वादातून पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार!

Pune Crime : ठेकेदारीच्या वादातून पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार!

आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात शिकत असलेल्या तरुणांवर एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ल्याच्या घटना किंवा पुण्यात सक्रिय असलेली कोयता गँग यामुळे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यातच एक धक्कादायक घटना पुण्याच्या हडपसर भागात घडली आहे. हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ठेकेदारीच्या वादातून शेवाळेवाडीत दिवसाढवळ्या गोळीबार (Gun Firing) झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सोसायटी सिक्युरिटी कामगार पळविण्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसाढवळ्या गोळीबार केला. यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एक माजी सैनिक असून दुसरा आरोपी त्यांचा मुलगा आहे. ऋषिकेश शेंडगे व सुधीर शेंडगे अशी त्यांची नावे आहेत. तर जयवंत खलाटे असं गोळीबार झालेल्या जखमी माजी सैनिकाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे व गुन्हे टीमने भेट देऊन तपासाची संपूर्ण माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी दोघेही माजी सैनिक असून दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शेवाळेवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला. दोन सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला होता.

त्यानंतर शेंडगे घरी जाऊन पिस्तूल घेऊन आला आणि शेवाळेवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली, यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -