ST Ticket Price Hike: लालपरीचा प्रवास महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

'इतक्या' टक्क्यांनी होणार तिकीट दरवाढ


मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झळ सोसावी लागणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. देशभरातील अनेक लोक उन्हाळी सुट्ट्यांसाठी, देवदर्शनासाठी, गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. बहुतेकदा अनेकजण खिशाला परवडणाऱ्या प्रवासाकरिता लालपरीने प्रवास करतात. आता याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.



इतके वाढणार तिकीट दर


सुट्टीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही हंगामी तिकीट दरवाढ असणार आहे. म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते १५ जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात आले आहे. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.



उन्हाळी सुट्टीसाठी धावणार विशेष गाड्या


राज्यातील सर्वात कठीण मार्गांवर आणि प्रादेशिक स्तरावर स्थलांतरितांच्या मागणीनुसार विशेष गाड्या चालवल्या जातील. गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयातून ४९६ गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबईत २११, पुण्यात ३३२, छत्रपती संभाजीनगरमध्ये २४९, नाशिकमध्ये १९९, अमरावतीमध्ये ५१ आणि नागपूरात ४६ विशेष गाड्या धावत आहेत. प्रत्येक विशेष ट्रेन सरासरी ४५० किलोमीटर अंतराचा प्रवास करेल, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर