Rain Alert: कुठे पाऊस तर कुठे ऊन; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

  118

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा!


विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट


मुंबई : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस असे बदलते वातावरण दिसून येते. यंदाचा उन्हाळा अधिक कडक असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच आता आज मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.



कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट


चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट दिला आहे.



काही भागात उन्हाच्या झळा


एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा


एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात पुढील २४ तास पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची