नागपूर : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आली असताना मतदारयाद्यांमध्ये (Voter List) प्रचंड घोळ झाल्याच्या घटना घडत आहेत. फोटो एकाचा तर त्यासमोर भलत्याचेच नाव दिसून येत आहे. असा प्रकार मतदारयादीत आपले नाव बघायला गेलेल्या मतदात्यांना दिसून आला. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वॉर्डातील मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदारांनी त्याच्या दुरुस्तीची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीत मतदारयादी निवडणूक ओळखपत्रासह इतर काही आवश्यक शासकीय ओळख देणारा पुरावा मतदान करताना वापरता येतो. तशी मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र मतदारयादीतच चुकीचा फोटो व दुसऱ्याचे नाव आले असल्याने तारांबळ उडाली आहे.
शहरातील समाजसेवक हाजी मोहम्मद अशरफ, त्यांचे बंधू मोहम्मद सलीम व परिवारातील सदस्यांच्या फोटोखाली इतर दुसऱ्यांचे नाव आल्याचा प्रकार मतदारयादीतून पुढे आला आहे. दुसरीकडे त्यांचा फोटो आणि त्यांचे योग्य नावसुद्धा आहे. अर्थात दोन वेळा मतदारयादीत त्यांचा फोटो वापरला गेला. त्यामुळे इतरही मतदार आता आपले नाव मतदारयादीत फोटोसह तपासत असल्याचे चित्र आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…