Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

Maha Vikas Aghadi : सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी

Maha Vikas Aghadi : सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी

मविआमध्ये काँग्रेसची शक्ती पडतेय कमी?


मुंबई : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) धुरळा उडत आहे. प्रत्येकजण आपपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसून मेहनत घेत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली (Sangli Lok Sabha Election) आणि भिवंडीच्या (Bhiwandi Lok Sabha Election) जागेवरून महाविकास आघाडीत मोठी तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ असताना त्यावरती ठाकरे गट आणि शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.


सांगली लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि सर्वच पक्षांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. यासाठी सुरुवातीपासूनच काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रातील सांगली आणि भिवंडीच्या जागेने महाविकास आघाडीत बिघाडी करायला सुरुवात केली आहे. कारण सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने तर भिवंडीच्या जागेवर शरद पवार गटाने दावा केल्यामुळे काँग्रेसची शक्ती कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीची उदासिनता आहे.



काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी


या दोन्ही जागांवरती काँग्रेसचा दावा कायम असताना ठाकरे आणि पवारांनी परस्पर या जागांची घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही. यावरून स्पष्ट होतंय की जागा वाटपाच्या वाटाघाटीत कुठेतरी काँग्रेसचे नेते कमी पडले आणि त्यामुळे काँग्रेस आज महाविकास आघाडीमध्ये बॅकफूटवर जाताना पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment