भाजपाच्या तिकिटावर कंगना उतरणार लोकसभेच्या रिंगणात

नवी दिल्ली : बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे, ही देशातील दुसरी सर्वात मोठी संसदीय जागा आहे. २०२१ मधील पोटनिवडणुकीत कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची बरीच चर्चा चालू होती. मात्र त्यावेळी भाजपाने कंगना ऐवजी कारगिल हिरो कुशल ठाकूर यांना उमेदवार केले होते.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अनेक दिवसांपासून कंगना निवडणुकीच्या रिंगणात असल्याबद्दल प्रत्येक व्यासपीठावरून आवाज उठवला जात होता. गेल्या अनेक दिवसांमध्ये तिला उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू होती. आता भाजपा हायकमांडने या चर्चेला पूर्णविराम देत लोकसभा उमेदवारांच्या पाचव्या यादीत अखेर कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यंदा कंगना पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे.

Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा