Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. 'वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो' (मुंबई) आणि स्थानिक वनविभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धडक कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून बिबट्याची कातडी आणि चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.



गुप्त माहितीच्या आधारे लावला सापळा


मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी नवापूर परिसरात येणार होते. या माहितीची दखल घेत मुंबई येथील 'वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो'चे पथक आणि नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये नंदुरबार, चिंचपाडा आणि नवापूर प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने नवापूर एमआयडीसी परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार (क्रमांक: GJ 26 A 1513) आणि तीन दुचाकींवरून बिबट्याच्या कातडीचे तुकडे घेऊन जात असताना, वनविभागाच्या पथकाने त्यांना अडवून त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे बिबट्याच्या कातडीचे तुकडे मिळून आले. पथकाने तात्काळ पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील कार आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.



पुढील तपास सुरू


ताब्यात घेतलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल नवापूर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये आणण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध 'भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमा' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कातडी कोठून आणली आणि याचे जाळे कुठेपर्यंत पसरलेले आहे, याचा सखोल तपास आता वनविभाग करत आहे. या कारवाईमुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आणि त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी