Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या या महत्त्वाकांक्षी पावलाचे स्वागत होत असतानाच, विरोधी पक्षांनी 'परिसीमन' म्हणजेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रक्रियेमुळे काही राज्यांचे किंवा विशिष्ट वर्गांचे राजकीय नुकसान होऊ शकते, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांच्या या शंकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत बोलताना थेट उत्तर दिले. "मतदारसंघांची पुनर्रचना करताना कोणत्याही राज्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर अन्याय होणार नाही," अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, महिलांना हक्क मिळवून देणारी ही प्रक्रिया पारदर्शक असेल. "ही मोदींची गॅरंटी आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आश्वस्त करत, या विधेयकावर सर्वांनी मिळून शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन केले.



"हा राजकारणाचा नाही, तर राष्ट्रहिताचा निर्णय"


राजकीय चष्म्यातून पाहू नका; पंतप्रधानांचे भावनिक आवाहन



"विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महिला शक्तीचा सहभाग अनिवार्य आहे, त्यामुळे सर्वांनी मोकळ्या मनाने या निर्णयाचा स्वीकार करावा," असे पंतप्रधान म्हणाले. देश आज केवळ सरकारचा निर्णयच नाही, तर त्यामागची 'नियत' (हेतू) देखील पाहत आहे, असे नमूद करत त्यांनी या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याची विनंती केली. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे (परिसीमन) दक्षिण भारतातील राज्यांच्या जागा कमी होतील किंवा त्यांच्यावर अन्याय होईल, अशी भीती काही राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात होती. या शंकांचे निरसन करताना पंतप्रधान ठामपणे म्हणाले की, "उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम; हे सरकार कोणत्याही राज्याशी भेदभाव करणार नाही." ही निर्णय प्रक्रिया पूर्णपणे न्याय्य असेल आणि दक्षिण भारताच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या तांत्रिक मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधानांनी सांगितले की, भूतकाळात ज्या ज्या सरकारांच्या काळात परिसीमन झाले, जे प्रमाण आणि सूत्र तेव्हापासून चालत आले आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जागांची वाढ ही पूर्वीच्याच प्रमाणात होईल, त्यामुळे कोणत्याही राज्याने घाबरण्याचे कारण नाही. २०२९ मध्ये देशासमोर मोठी संधी आहे आणि आता जर आपण निर्णय घेण्यास विलंब केला, तर देशातील माता-भगिनींचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.



"काश्मीर ते कन्याकुमारी आपण एकच!"; स्वच्छ नियतीची हमी


पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाच्या एकतेवर भर दिला. "संविधानाने आपल्याला देशाचा तुकड्यांमध्ये विचार करण्याचा अधिकार दिलेला नाही. आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक राष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे," असे ते म्हणाले. आपली नियत स्वच्छ असल्याचे सांगत त्यांनी जाहीरपणे शब्दाची हमी दिली की, ही प्रक्रिया कोणावरही अन्याय करणारी ठरणार नाही. "हा माझा शब्द आहे आणि हीच माझी गॅरंटी आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय