India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे निर्बंध इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्यानंतर कमी एक महिन्यासाठी कमी केले होते. आता पुन्हा एकदा हे निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रशियन तेल खरेदीसाठी मिळालेली ३० दिवसांची सूट संपुष्टात आली आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल आणि एलपीजीची खरेदी सुरूच ठेवणार आहे. भारताचे ऊर्जा आयात धोरण हा पूर्णपणे भारताचा स्वतःचा निर्णय आहे आणि ते अमेरिकेच्या निर्बंधांवर अवलंबून नाहीत, असे भारत सरकारने ठणकावून सांगितले आहे.


अमेरिकेने सूट वाढवली नसली तरी, भारतीय रिफायनरी निर्बंधांच्या अधीन नसलेल्या कंपन्या आणि जहाजांकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवतील. सूट देणे किंवा न देणे हा अमेरिकेचा विशेषाधिकार आहे, परंतु त्यामुळे ते भारताचे धोरण ठरत नाही. ‘रशियाकडून अधिक एलपीजी खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कच्चे तेल आणि एलपीजी दोन्ही निर्बंधमुक्त स्रोतांकडून येत राहतील,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने आर्थिक निर्बंध वाढवण्याची तयारी करत असल्याचे आणि इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. मार्च २०२६ मध्ये भारताने रशियाकडून दररोज सरासरी १९.८ ते २०.६ लाख बॅरल तेल आयात केले.मार्च २०२६ मध्ये, चीननंतर भारत रशियन ऊर्जेचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार होता, त्यांनी अंदाजे ५.८ अब्ज युरोची आयात केली. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत प्रत्येक संभाव्य स्रोताकडून ऊर्जा खरेदी करण्याचे धोरण अवलंबत आहे. युक्रेन युद्धानंतर भारत रशियाचा सर्वात मोठा सागरी खरेदीदार बनला होता. आता, इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलली असून, भारताने रशियाकडून आपली तेल खरेदी वाढवली आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत