Rajeev Kumar : पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांची बदली

'या' राज्यांच्या गृहसचिवांनाही हटवण्याचे आदेश


लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे मोठे पाऊल


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठं पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार (Rajeev Kumar) यांना हटवून त्यांना आयटी डिपार्टमेंटचा सेक्रेटरी बनवलं आहे. त्यांच्या जागी आता विवेक सहाय हे पोलीस प्रमुखाची जबाबदारी सांभाळतील.


सहाय यांनी याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान ममतांच्या पायाला जखम झाली होती. त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आले होते.


पश्चिम बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार हे अनेक वादांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर उघडपणे तृणमूलला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीआधी ते कोलकाताचे पोलीस कमीशनर होते. त्यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी ममतांच्या इशाऱ्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर त्यांना तेव्हा पदावरुन हटवण्यात आलं होतं. पण, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस कमिशनर करण्यात आलं होतं.



अधिकाऱ्यासाठी धरणे आंदोलन


राजीव कुमार हे त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे जेव्हा सीबीआयने राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता, तेव्हा ममतांनी धरणे आंदोलन केले होते. शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयने राजीव कुमार यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. ममतांनी याविरोधात तब्बल ७० तास धरणे आंदोलन केले होते. सुप्रीम कोर्टाने जेव्हा राजीव कुमार यांच्या अटकेला स्थगिती दिली. तेव्हा कुठे ममतांनी माघार घेतली होती. कुमार यांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.


विशेष म्हणजे मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पश्चिम बंगालच्या डीजीपी पदावर राजीव कुमार यांची नियुक्ती झाली आहे. याआधी आयटी डिमार्टमेंटचे सचिवपद ते सांभाळत होते. यावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. राजीव कुमार हे सत्ताधारी पक्षाचे काळे कारनामे लपवून ठेवत होते. संदेशखाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहां शेखला ते वाचवत होते, असं सीपीआय(एम) नेते मोहम्मद सलीम म्हणालेत. भाजपकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.



या राज्यांच्या गृहसचिवांनाही हटवण्याचे आदेश


पश्चिम बंगालचे डीजीपी कुमार यांच्याशिवाय, आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृह सचिवांसह बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय हटवण्यात आलेल्यांच्या यादीत मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोगाचा हा आदेश आला आहे.



राजीव कुमार कोण आहेत?


उत्तर प्रदेशचे असलेले राजीव कुमार यांची पहिली पोस्टिंग चंदननगरमध्ये झाली होती. त्यानंतर ते बीरभूमचे एसपी झाले. २००८ मध्ये ते कोलकाता एसटीएफचे जॉईंट कमिशनर होते. शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांची टीम आरोपींना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेली होती. यानंतर काही महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता.


 
Comments
Add Comment

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.