Thursday, May 7, 2026

तुम्ही सतत तळलेले पदार्थ खाता का? तर होऊ शकतात हे त्रास

तुम्ही सतत तळलेले पदार्थ खाता का? तर होऊ शकतात हे त्रास
मुंबई: तुम्हाला माहीत आहे का प्रोसेस्ड फूड तसेच तळलेले पदार्थ तुमच्या स्किनसाठी नुकसान करणारे असतात. हे खाणे केवळ आपल्या आरोग्यासाठीच चांगले नसतात तर यामुळे त्वचाही खराब होऊ शकते. यात मोठ्या प्रमाणात मीठ, तेल आणि साखर असते जी आपल्या स्किनसाठी खराब ठरू शकते. तसेच यामुळे सुरकुत्याही येऊ शकतात. इतकंच नव्हे तर हे पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पुरळ, मुरूमे येऊ शकतात.

ट्रान्सफॅट्सचे नुकसान

तळलेले आणि प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्स फॅट्स असतात जे त्वचेचा ओलावा कमी करतात. याच कारणामुळे स्किन ड्राय आणि निस्तेज बनते. हे फॅट्स केवळ आपल्या त्वचेच्या आरोग्याचे नुकसानच करत नाही तर निस्तेजही बनवतात.

मुरूमांची समस्या

या जेवणामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्च मोठ्या प्रमाणात असतो ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. यामुळेही चेहऱ्यावर मुरूमे तसेच अन्य समस्या जाणवतात.

वाढलेले वय

तळलेले तसेच प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीरात फ्री रॅडिकल्स वाढतात. यामुळे स्किनचे कोलेजन कमी होते. यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया जलद होते.

पोषणतत्वांची कमतरता

अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये पोषणतत्वे नसतात. यामुळे शरीराला आवश्यक व्हिटामिन्स तसेच मिनरल्स मिळत नाहीत. यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा