Sangeet Natak Academy : अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची नावे 


मुंबई : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनातर्फे 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारतर्फे त्यांना बहुमान मिळणार आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या​फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यादीत अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यांसोबतच विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali), अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), ढोलकीवादक विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला, इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. काल रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.



संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी :


- अशोक सराफ, अभिनय
- विजय शामराव चव्हाण, ढोलकीवादक
- कलापिनी कोमकली, हिंदुस्तानी शास्त्रीय सगीत
- नंदिनी परब गुजर, सुगम संगीत
- सिद्धी उपाध्ये, अभिनय
- महेश सातारकर, लोकनृत्य
- प्रमिला सूर्यवंशी, लावणी
- अनुजा झोकरकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
- सारंग कुलकर्णी, सरोद वादक
- नागेश आडगावकर, अभंग संगीत
- ऋतुजा बागवे, अभिनय
- प्रियांका शक्ती ठाकूर, पारंपारिक कला


संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी