Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सCyber crime : भंगार चोरीसाठी ‘पोर्टर ॲप’चा वापर

Cyber crime : भंगार चोरीसाठी ‘पोर्टर ॲप’चा वापर

  • गोलमाल : महेश पांचाळ

ग्राहकांच्या सोयीसुविधांसाठी अनेक मोबाइल अॅप्स सध्या उपलब्ध आहेत. त्या अॅपचा वापर कशासाठी करायचा हे ग्राहकांना ठाउक असते. परंतु खोटे ग्राहक बनवून पोर्टर अॅपचा वापर कसा केला जातो, त्याचे ताजे उदाहरण या प्रकरणामुळे उघडकीस आले आहे. चोरीचा मामला आणि मामाही थांबला, असे गाणे मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय राहिलेले आहे; परंतु यातील चोरीचा मामला पोलिसांनी शोधून काढताना, पोर्टर अॅपचा काय संबंध आला हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरजवळील जागेवरून सुमारे १ हजार ५६८ किलो भंगार चोरीला गेल्याचे तक्रार मेट्रोचे साइट सुरक्षा पर्यवेक्षक गजेंद्र कदम यांनी १४ फेब्रुवारी रोजी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांच्या देखरेखीखाली तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास पथकाला त्या ठिकाणाहून एक टेम्पो जात असल्याची प्रथम माहिती मिळाली. पोलिसांनी आठवडाभर पाळत ठेवली होती. पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचली आणि चोरलेल्या भंगार साहित्याने भरलेला एक टेम्पो रंगेहात पकडला. या ठिकाणावरून चार जणांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींनी त्यांच्या चौकशीत एक वेगळी धक्कादायक माहिती पुढे दिली, ती म्हणजे टेम्पो बुक करण्यासाठी पोर्टर ॲप वापरत होत असल्याचा प्रकार समोर आला. बुकिंग एका आरोपीने केले होते; पण तो फारसा खुलासा करण्यास तयार नव्हता. तेव्हा त्याचा मोबाइल फोन तपासला आणि ॲप ॲडमिनिस्ट्रेटरच्या मदतीने त्यांच्या बुकिंगचे तपशील मिळवले. त्यावेळी बहुतेक बुकिंग महाराष्ट्र नगरमधून पिकअपसाठी मंडाळा, मानखुर्द येथील भंगार विक्रेत्याकडे डिलिव्हरीसाठी होते, अशा बुकिंगसाठी त्यांनी ४५पेक्षा जास्त वेळा याचा वापर केल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी चोरीचे साहित्य खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला ओळखले आणि त्याला अटक केली. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या सर्वांवर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे नोंद दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी एकूण १७.८६ लाख रुपये किमतीचा भंगार आणि एक टेम्पो जप्त केला.

पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंगसाठी या परिसरात गेलेल्या पोर्टर ड्रायव्हर्सशी देखील संपर्क साधला. या भंगारी चोरीसाठी वाहतुकीसाठी निर्धारित रकमेच्या दुप्पट ऑफर दिल्यानंतर काही ड्रायव्हर्सनी पिकअप संशयास्पद असल्याचे सांगितले. आरोपींनी प्रत्येक फेऱ्यांसाठी वेगळे वाहन आणि चालक मिळवून संशय टाळण्यासाठी ॲपचा वापर केला होता, अशी माहिती उघड झाली. जेव्हा जेव्हा एखाद्या ड्रायव्हरला या बुकिंगबाबत संशय आला आणि त्यांनी बुकिंग रद्द करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून भंगार विक्रेत्याकडून ७०० किलोपेक्षा जास्त भंगारही जप्त केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी आरोपी रात्री चोरी करायचे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ठरावीक दिवसानंतर ते भंगारी चोरी करत आहेत. टेम्पो बुक करण्यापासून ते लोड करण्यापर्यंत प्रत्येकाला एक विशिष्ट काम
दिले होते, अशी माहिती तपासात पुढे आली.

maheshom108gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -