लखनऊ : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात माघी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाला.
माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमध्ये भरुन सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ४० पेक्षा जास्त भाविक बसले होते. भरगच्च ट्रॉली थेट तलावात पलटी झाल्याने १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत.
दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ८ महिला आणि ७ मुलांचा समावेश आहे. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…