Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : नितेश राणे आज मीरा रोडमध्ये; ट्वीट करत दिली माहिती

Nitesh Rane : नितेश राणे आज मीरा रोडमध्ये; ट्वीट करत दिली माहिती

दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर येणार मीरा रोडमध्ये

ठाणे : मीरा रोडच्या (Mira Road) नया नगर परिसरात रविवारी २१ जानेवारी रोजी, रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी १५ जणांना अटक केली. त्यामुळे नया नगर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच बॅरिकेडिंगच्या माध्यमातून पोलीस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज मीरा रोडला जाणार आहेत. नितेश राणे यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मीरा भाईंदरप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई केली जाणार आहे. अवैध बांधकाम व धंदे असतील ते बंद होतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सरनाईकांची २५ जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन, नया नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना ४८ तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. मिरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी २५ जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक दिली आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -