Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडी

Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी ऑनलाईन पास व प्रसादाची सोय? वेळीच व्हा सावध!

Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी ऑनलाईन पास व प्रसादाची सोय? वेळीच व्हा सावध!

ऑनलाईन होतेय फसवणूक

अयोध्या : अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) आता केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी (Ramlalla Pran Pratishtha) अयोध्येसोबतच अख्खा देश सजला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याची प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. मात्र, याचा काहीजणांकडून गैरफायदा घेतला जात आहे. अयोध्येमध्ये राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यासाठी व्हीआयपी पास देण्याचे आमिष दाखवून भाविकांची फसवणूक केली जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि मंदिर ट्रस्टच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

सदर फसवणुकीबाबत 'आमच्यातर्फे पैसे घेऊन असे कोणतेही पास देण्यात येत नसून भाविकांनी फसवणुकीपासून सावध राहावे', असे मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे व्हीआयपी पास सोबतच ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवर अयोध्येतील रामाचा प्रसादही ऑनलाईन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशा पद्धतीने प्रसादासाठी ऑनलाईन सेवा नसल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना सुरुवात

अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींची मंगळवारी जोरदार सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत बुधवारी राममूर्तीचा मंदिर परिसर प्रवेश विधी संपन्न झाला. त्याचप्रमाणे सकाळी कलश पूजनही करण्यात आले. शरयू नदीच्या तीरावर झालेल्या या कलश पूजनाला राजमजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी या विधीमध्ये सपत्नीक सहभागी होत कलश पूजनाचे विधी केले. या विधीनंतर शरयूमधील जल कलशांतून राममंदिरात नेण्यात आले. आता सर्वांनाच २२ जानेवारीच्या क्षणाची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment