Manoj Jarange : मनोज जरांगेंना वाटते आंदोलनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती

मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा जरांगेंचा आरोप


जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी मुंबईतील आंदोलनाआधी ट्रॅप लावला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे असे प्लॅनिंग सुरू आहे. पण आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही.


माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे, मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या त्या आता सगळ्या बंद पडल्या आहेत. अशा लोकांना मी आतून खपत नाही. या लोकांना आरक्षणाचा विषय संपू द्यायचाच नव्हता. त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.


जरांगे पाटील पुढे म्हणाले, याबाबत मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता आम्ही सावध झालो आहोत. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचाराचा प्रयत्न करत आहे का, यावर आता आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. काल राज्य सरकारमधील मंत्र्यांची बैठक झाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. तर काही जणांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचाही सल्ला दिल्याची माहिती आम्हाला समजली आहे. या माहितीची खातरजमा करत आहोत. त्यानंतर आरक्षणाला विरोध असणाऱ्या मंत्र्यांचीही नावं आम्हाला कळतील, असे जरांगे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र