
नवी दिल्ली: मालदीव आणि भारत यांच्यांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी सांगितले की भारताने १५ मार्चआधी आपले सैन्य हटवावे. याआधी त्यांनी नाव न घेता सांगितले होते की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.
गेल्या काही वर्षा मालदीवमध्ये भारतीय लष्कराची लहान तुकडी तेथे उपस्थित आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या आग्रहानंतर भारत सरकारने आपले सैन्य तेथे तैनात केले होते. समुद्री सुरक्षा आणि आपातकालीन कार्यांमध्ये मदतीसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या विधानात म्हटले होते की त्यांच्या देशाला आशा आहे की भारत लोकांच्या लोकतांत्रिक इच्छेचा सन्मान करेल.
मुईज्जू हे शनिवारी चीनवरून पाच दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. ते मालदीवला पोहोचताच म्हटले की भले आमचा देश लहान आहे मात्र आम्हाला बुली करण्याचा लायसन्स कोणालाही नाही. दरम्यान, मुईज्जू यांनी प्रत्यक्षपणे नाव घेऊन हे विधान केलेले नाही. मात्र त्यांनी भारताला निशाणा केला होता असे बोलले जाते.