मुंबई : हल्ली सिनेकलांकारांसोबत (Movie actors) चोरीचे तसेच सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून लाखो, करोडो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरी चोरी झाली आहे. वांद्रे (Bandra) येथील तिच्या राहत्या घरातून तब्बल सहा लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी नेहा पेंडसेच्या पतीच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वांद्रे पश्चिम येथे अरेटो बिल्डिंगमध्ये नेहाचा व तिचा पती शार्दुल सिंह बयास यांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून काही दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये लग्नात त्यांना मिळालेलं एक सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी याचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल सहा लाख आहे. या प्रकरणी नेहाचा पती शार्दुल याचा ड्रायव्हर रत्नेश झा याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
२८ डिसेंबर रोजी शार्दुलच्या लक्षात आलं की, कपाटात असणारं सोन्याचं कडं आणि एक हिऱ्यांची अंगठी गायब होती. अनेकदा शार्दुल हे कडं आणि अंगठी घालायचा आणि कपाटात काढून ठेवायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने या दोन्ही वस्तू घरात काम करणाऱ्या सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याकडे दिल्या आणि त्याला त्या कपाटात ठेवायला सांगितल्या. पण त्या वस्तू नंतर कपाटात मिळाल्याच नाहीत.
या प्रकरणी शार्दुलने घरातल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. परंतु त्यापैकी कोणाकडूनच दागिन्यांविषयी काही माहिती मिळाली नाही किंवा त्यांच्याकडे दागिने सापडले नाहीत. या चौकशीवेळी सुमीत मात्र अनुपस्थित होता, त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्याला फोन केला असता, त्याने तो कुलाबा इथे मावशीकडे आल्याचं सांगितलं आणि घरी येण्यास टाळाटाळ केली. सुरुवातीला त्याने दागिने कपाटात ठेवल्याचं सांगितलं. पण दागिने नसल्याने शार्दुल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी सुमीत नावाच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…