Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीSuruchi Adarkar : लग्नानंतर काही दिवसांतच सुरुची अडारकरने घेतला 'हा' मोठा निर्णय

Suruchi Adarkar : लग्नानंतर काही दिवसांतच सुरुची अडारकरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुरुची होणार व्हिलन

मुंबई : अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच ६ डिसेंबर रोजी अभिनेता पीयुष रानडेसोबत (Piyush Ranade) विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे पीयुषचं हे तिसरं लग्न आहे, तर सुरुचीने पहिल्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच सुरुचीने अजिबात वेळ न दवडता कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुचीला ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती तब्बल ८ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर (Zee Marathi) दिसणार आहे. यावेळेस ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिचा हा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satavya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या चांगली गाजत आहे. यात तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय ऐश्वर्या नारकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. याच मालिकेतून सुरुची दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.

सुरुचीचं पात्र मालिकेतील विरोचकाच्या सेवकाशी संबंधित असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे. भूमिकेसाठी सुरुचीला काहीसा ग्लॅमरस लूक देण्यात आला आहे. ६ जानेवारीला प्रसारित होणाऱ्या भागात सुरुची एन्ट्री घेणार आहे.

‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसह सुबोध भावे व सुयश टिळक हे दोन अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -