Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीSridevi Prasanna : अरेंजवाल्या लव्हस्टोरीत प्रसन्नवर होणार का 'श्रीदेवी प्रसन्न'?

Sridevi Prasanna : अरेंजवाल्या लव्हस्टोरीत प्रसन्नवर होणार का ‘श्रीदेवी प्रसन्न’?

काय आहे ही सिद्धार्थ आणि सईची आगळीवेगळी कहाणी? पहा धमाकेदार टीझर…

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याचा ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हा सिनेमा प्रचंड गाजला, तर ‘ओले आले’ (Ole ale)हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्यातच आज त्याचा नवा सिनेमा ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार टीझर आऊट (Sridevi Prasanna Teaser out) झाला आहे. त्यामुळे हे वर्षही सिद्धार्थसाठी लय भारी असणार आहे. या सिनेमात त्याच्या जोडीला मराठीतील बोल्ड, ब्युटीफुल, बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar)असणार आहे. त्यांची ही केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

चित्रपटाच्या टीझरमध्ये आपल्याला सई ‘श्रीदेवी’ नावाच्या भूमिकेत अत्यंत साधी आणि सोज्वळ पाहायला मिळते. पण संपूर्ण चित्रपटात फक्त सोज्वळ नाही तर श्रीदेवीच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, याचा अंदाज टीझर पाहून येतो. दुसरीकडे सिद्धार्थ ‘प्रसन्न’ नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे, जो अत्यंत बिनधास्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सई आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

या चित्रपटात काय पाहायला मिळणार?

लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी आणि प्रसन्न या दोघांची कहाणी ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘लव अ‍ॅट फर्स्ट साईट’चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर ‘श्रीदेवी’ या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अ‍ॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही, त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमाच्या माध्यमातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे १०० टक्के मनोरंजन करणार आहे.

कोण आहेत कलाकार आणि तंत्रज्ञ? (Cast and Crew)

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी अदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्द केली आहेत. विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -