Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली रणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल

रणबीरने 'जय माता दी' म्हणत केलं असं काही, की नेटकरी संतापले...


मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood Actor Ranbir Kapoor) सध्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा ५०० कोटींहून अधिक कमाई करत प्रचंड यशस्वी झाला आहे. त्यातच त्याने ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी त्याची मुलगी राहाला (Raha Kapoor) पहिल्यांदा पॅपराझींसमोर आणलं. राहाचा गोंडस अंदाज सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळेही रणबीर चर्चेत आला आहे. पण याचसोबत आता रणबीर अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अभिनेता रणबीर कपूरने आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कपूर कुटुंबच जास्त दिसत आहे. यातील ख्रिसमस साजरा करतानाची रणबीरची एक कृती चाहत्यांच्या आवडली नसून त्याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या या कृतीविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





रणबीर कपूर ख्रिसमस सेलिब्रेशनच्या या व्हिडिओमध्ये जय माता दी असं म्हणतो. या यानंतर तो केकवर दारू ओततो आणि त्याला आग लावतो. नेटिझन्सना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही. रणबीरवर धार्मिक भावना (Religious sentiments) दुखावल्याचा आरोप होत आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल केले जात आहे.


रणबीरविरोधात काल मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणताही प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत संजय तिवारी यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.




 


काय आहे तक्रार?


पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आर्जव करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते, परंतु कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाणूनबुजून अमली पदार्थाचा वापर केला आणि दुसर्‍या धर्माचा सण साजरा करताना जय माता दीचा नारा दिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि