चेन्नई : शाळेपासून प्रेम असलेल्या प्रियकरासोबत प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराने तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी आरोपी प्रियकर वेत्रिमनी याला बेड्या ठोकल्या आहेत.
चेन्नईच्या थलंबूर येथील प्रियकर वेत्रिमनीने आपल्या प्रेयसीच्या प्रेमासाठी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली होती. पण ऐनवेळी प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे राग अनावर झाल्याने त्याने तिचे हातपाय बांधून जाळले. त्याने मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलून पुरुष झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपी मित्र वेत्रिमनी आणि पीडिता तरुणी आर. नंदीनी लहानपणीपासूनचे मित्र असून एकाच शाळेत शिकत होते. वेत्रीमनीने काही दिवसांपूर्वी लिंग बदल शस्त्रक्रिया केली. त्याचे आधीचे नाव पांडी माहेश्वरी होते. लिंगबदल शस्त्रक्रिया करून पांडी माहेश्वरी वेत्रिमनी झाला. आरोपी आणि पीडिता एकत्र मुलींच्या शाळेत शिक्षण घेत होते. यावेळी दोघींची एकदम खास मैत्री होती. यानंतर पांडी माहेश्वरीने नंदीनीसोबत लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. पण, नंदीनीला तिचे बदललेले स्वरुप पटले नाही. ती त्याच्यापासून दूर-दूर राहू लागली. नंदिनीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर वेत्रिमनीने नंदिनीला तिच्या वाढदिवसादिवशीच संपवण्याचा घाट घातला.
आर. नंदिनीचा २६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेत्रिमनीने तिला पार्टीसाठी बोलावले. त्यांनी संपूर्ण दिवस सोबत घालवला. खरेदी केली, अनाथ आश्रमाला भेट दिली. यानंतर घरी जाण्याच्या वेळी वेत्रिमनीने गाडी निर्जनस्थळी थांबवली आणि गिफ्ट देण्याच्या बहाण्याने नंदिनीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली आणि मस्करी करत हात-पाय बांधले. यानंतर वेत्रिमनीने ब्लेडने नंदिनीच्या शरीरावर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या मानेवर आणि हातापायावर वार केले. यानंतर त्याने नंदिनीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.
नंदिनी बचावासाठी ओरडत असताना आजूबाजूने जात असलेल्या नागरिकांनी तिचा आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नंदिनीचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाण्याआधी नंदिनीने पोलिसांना फोन नंबर दिला होता, तो वेत्रिमनीचा होता. पोलिसांनी फोन केल्यानंतर वेत्रिमनीने रुग्णालयात जाऊन ओळख पटवली. यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान नंदिनीचा मृत्यू झाला. यादरम्यान वेत्रिमनी फरार झाला होता. मात्र कसून चौकशी करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…