पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात (Pune) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना (Crime incidents) घडत आहेत. आरोपींसाठी अत्यंत कडक असलेल्या पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) तर चक्क आरोपी पळून गेल्याच्या घटना देखील घडल्या. त्यातच आता पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून हातात कोयते किंवा शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड (Car vandalized) करण्यात येत आहे. असाच प्रकार काल रात्री पुण्यातल्या येरवडा परिसरात घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पुण्यातल्या येरवडा भागात काल रात्री काही अज्ञातांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात १५ ते २० गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कार, दुचाकी आणि रिक्षाचा समावेश आहे. अशी तोडफोड करणार्या लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अयशस्वी ठरत आहेत, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
येरवडा परिसरातील काही नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी अद्याप तोडफोड करणार्या कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…