Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण

मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण

मुंबई : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीत एका ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, गुप्तांग आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत. आरोपीने महिलेला बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून घटनास्थळावरून पळ काढले. या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या महिलेला घरी सोडतो असे खोटे सांगून उमेश ढोके नावाचा हा ३८ वर्षीय नराधम चेंबूर मधील घरकाम व मासेविक्री करणाऱ्या त्या महिलेला मानखुर्द येथील आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत, नंतर मारहाण करत पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत त्याने तिला फेकून दिले आणि तो पळून गेला.

मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली. त्यानंतर या महिलेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

पीडित महिलेचा जबाब घेतल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका ६४ वर्षीय महिलेवर ३८ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चित्रा वाघ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची आणि तिच्या परिवाराची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे नक्की! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.

Comments
Add Comment