Sunday, October 11, 2026

Megablock : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेजर ब्लॉक

मुंबई : मुंबईतील मेट्रो ६ च्या स्टील गर्डर लाँचिंगच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २ आणि ३ मे च्या मध्यरात्री १० तासांचा विशेष 'मेजर ब्लॉक' जाहीर केला आहे. हा ब्लॉक जोगेश्वरी ते राम मंदिर स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेसह अप जलद आणि पाचव्या मार्गिकेवर घेण्यात येणार असल्याने विकेंडला प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ब्लॉकची वेळ आणि तपशील : सहावी मार्गिका: २ मे (शनिवार) रात्री ९:३० ते ३ मे (रविवार) सकाळी ७:३० पर्यंत (एकूण १० तास). अप जलद आणि पाचवी मार्गिका: २/३ मे च्या मध्यरात्री १:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत.

लोकल प्रवासावर परिणाम: ब्लॉक कालावधीत सहाव्या मार्गिकेवरील सर्व गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान अप जलद मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी रद्द केलेल्या गाड्यांची सविस्तर यादी सर्व रेल्वे स्थानकांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १९०३८ बरौनी–वांद्रे टर्मिनस अवध एक्सप्रेस ही गाडी सुरत ते बोरिवली दरम्यान सुमारे ३० मिनिटे उशिराने धावेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >