Tuesday, May 13, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

Nashik News : सिन्नर बस स्टॉपवर शिवशाहीने तरुणाला चिरडले; डोक्याचा झाला चेंदामेंदा

Nashik News : सिन्नर बस स्टॉपवर शिवशाहीने तरुणाला चिरडले; डोक्याचा झाला चेंदामेंदा

सिन्नर : नाशिक (Nashik News) जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भीषण अपघात झाला. येथे शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिवशाही बसने एका तरुणाला चिरडले.


मिळालेल्या माहितीनुसार, पालघर-शिर्डी शिवशाही बस सिन्नर स्थानकात प्रवेश करत असताना बस स्थानकातून बाहेर पडणारा हा तरुण थेट बसच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेला. यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला.


सिन्नर येथील सात पिर गल्ली येथे राहणारे विजय नामदेव मोरे वय वर्षे ४० यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या.

Comments
Add Comment