Health: फळांचा ज्यूस की फळे? थंडीमध्ये काय खाणे आहे योग्य

मुंबई: शरीराला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. मात्र अनेकदा असा सवाल येतो की फळ खाणे जास्त फायदेशीर की फळांचा ज्यूस पिणे. या दोघांपैकी काय निवडले पाहिजे. फळे स्वादिष्ट, ताजी तसेच व्हिटामिन आणि अँटी ऑक्सिडंटनी भरलेली असतात. तुम्ही ती अशीच खाऊ शकता अथवा ज्यूस काढून पिऊ शकता.



अख्खी फळे खाण्याचे फायदे


अख्खं फळ खाल्लायाने शरीरास मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. यामुळे पाचनशक्ती सुधारते तसेच ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. ताजी फळे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटामिन, अँटी ऑक्सिडंट तसेच फायटोकेमिकल्स मिळतात. फळे खाल्ल्याने लठ्ठपाणी तसेच जुन्या आजारांचा धोका कमी होतो. फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीरास भरपूर आहार मिळतो. सोबतच फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण अधिक असते. फळे वजन घटवण्यास फायदेशीर ठरतात. यात जांभूळ, सफरचंद, नासपती, आंबट फळे आणि द्राक्षांचा समावेश होतो.



फळांच्या रसाचे फायदे आणि नुकसान


फळांचा रस एक अथवा अधिक फळे मिक्स करून बनवला जातो. ही फळांची सेवन करण्याची सोपी पद्धत आहे. दरम्यान, संपूर्ण फळातून मिळणारे फायबरच्या तुलनेत रसातून कमी मिळते. जर तुम्ही ज्यूस पित असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे की तो पॅक्ड ज्यूस नसावा.



वजन घटवण्यासाठी ज्यूस प्यायला पाहिजे?


भले ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते मात्र असा कोणताही दावा नाही की ज्यूस प्यायल्याने वजन घटवण्यास मदत मिळते. वजन घटवण्यासाठी फळांचा रस हा उत्तम मार्ग नाही. अख्खं फफ खाण्यावजी ज्यूस प्यायल्यास एकूण मिळून अधिक कॅलरी शरीरात जाते. फळ आणि फळांचा रस दोन्ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. मात्र अख्खं फळ कधीही शरीरासाठी चांगले. मात्र जर तुम्ही फळांचा ज्यूस पित असाल तर त्यात साखर असणार नाही याची काळजी घ्या.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक