संसदेत गोंधळ घालणारे तृणमुलचा एक आणि काँग्रेसचे १४ खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या दोन्ही सभागृहातील मिळून १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेतील १४ तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या या खासदारांना उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेदरम्यान काँग्रेसच्या पाच खासदारांनी सभापतींच्या आसनाचा मान राखला नसल्याचे कारण दिले आहे. या निलंबित खासदारांमध्ये टी एन प्रथापन, हिबी एडन, डीन कुरियाकोसे, जोथी मणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे.


संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून काल दहाव्या दिवशी दोन तरूणांनी लोकसभेत घुसखोरी केली आणि पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काल संसदेचे कामकाज काही काळ तहकुब करण्यात आले. तरुणांच्या या कृत्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून आज तृणमुल आणि काँग्रेसच्या खासदारांनी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी सुरक्षेच्या कारणावरून लोकसभेत घोषणा देत गोंधळ घातला.


काँग्रेसच्या खासदारांनी ‘पीएम सदन मे आओ….अमित शाह शरम करो’ अशा प्रकारच्या घोषणा दोन्ही सभागृहात दिल्या गेल्या.


तर राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी गदारोळा करत घोषणा दिल्या. दरम्यान, निलंबनानंतर ओब्रायन यांनी संसदेच्या आवारात मूक निषेध आंदोलन केले.



या खासदारांचे झाले निलंबन


लोकसभा - माणिकम टागोर, कनिमोळी, पीआर नटराजन, व्ही के श्रीकांतम, बेनी बहन, के सुब्रमण्यम, एसआर प्रतिभा, एस व्यंकटेश, मोहम्मद जावेद, टीएन प्रतापन, हिबी इडेन, ज्योतीमनी, रम्या हरिदास, डीन क्युरिकोस.


राज्यसभा - राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस खासदार दारेक ओब्रायन.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व