नवी दिल्ली: आयपीएल २०२४च्या लिलावासाठी दुबईचा मंच तयार झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावासाठी ३३३ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले आहे. यावेळी या लिलावात ७७ खेळाडूंवर बोली लागू शकते. यात २१४ भारतीय आणि ११९ ओव्हरसीज खेळाडू असतील. २ प्लेयर्स असोसिएट संघाचे आहे. ११६ खेळाडू कॅप्ड आणि २१५ अनकॅप्ड सामील आहेत. याआधी ११६६ खेळाडूंनी लिलावासाठी आपले नाव नोंदवले होते.
आयपीएल लिलावाचे आयोजन १९ डिसेंबरला दुबईच्या कोका कोला एरिनामध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. लिलावात सर्वाधिक बेस प्राईज २ कोटी आहे. यात २३ खेळाडूंचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रेविस हेड आहे. दुसरी सर्वाधिक बेस प्राईज १.५ कोटी आहे यात १३ खेळाडूंचा समावेश आहे.
२ कोटींच्या बेस प्राईजसाठी भारताचे ३ क्रिकेटर
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावातील सर्वोच्च बेस प्राईज असलेल्या कॅटेगरीत भारताचे ३ खेळाडू सामील आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेल, उमेश यादव आणि ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर यांचे नाव समाविष्ट आहेत. ओव्हरसीज खेळाडूंमध्ये ट्रेविस हेडशिवाय पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जोश इंग्लिश, जोश हेझलवूड आणि सीन एबॉट यांचाही समावेश आहे.
🚨 NEWS 🚨
IPL 2024 Player Auction list announced.
The roster for the Indian Premier League (IPL) 2024 Player Auction has been unveiled. The auction is set to take place in Dubai at the Coca-Cola Arena on December 19th, 2023.
𝗔𝗹𝗹 𝗧𝗵𝗲 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝘀 🔽… pic.twitter.com/w26igPZRBH
— IndianPremierLeague (@IPL) December 11, 2023
दक्षिण आफ्रिकेचे राईली रुसो, रासी वॅन डेर डुसेन, गेराल्ड कोएत्जी यांच्याशिवाय लौकी फर्ग्युसन अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान आणि बांगलादेशचा मुस्तफिजुर रेहमानलाही दोन कोटी रूपयांच्या बेस प्राईजमध्ये आहे. इंग्लंकडून हॅरी ब्रूक, क्रिस वोक्स, जेम्स विंग, जेमी ओवर्टन, आदिल रशीद, डेविड विली आणि बेन डकेट यांच्या नावाचा समावेश आहे.
कोणत्या संघाला हवेत किती खेळाडू
चेन्नई सुपर किंग्स संघात ६ जागा रिकामी आहेत. यात ३ खेळाडू विदेशी हवेत. दिल्ली कॅपिटल्सला ९ खेळाडूंची गरज आहे. यात ४ ओव्हरसीज आहेत. गुजरात टायटन्सचा संघ लिलावात ८ खेळाडूंना खरेदी करू शकतो. यात २ परदेशी असतील. केकेआरकडे १२ जणांची जागा खाली आहे. यात ४ परदेशी आहेत. लखनऊ सुपरजायंटकडे ६ खेळाडू हवे असतील यात २ परदेशी असतील. तर मुंबई इडियन्स संघात ८ खेळाडूंची जागा खाली आहे. पंजाब किंग्स, आरसीबी, राजस्थान आणि हैदराबाद यांच्याकडे अनुक्रमे ८,६,८,६ या खेळाडूंच्या जागा रिक्त