Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीMPमधील बंपर विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी कुटुंबियासोबत घालवला वेळ, हॉटेलमध्ये खाल्ले छोले-भटुरे

MPमधील बंपर विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी कुटुंबियासोबत घालवला वेळ, हॉटेलमध्ये खाल्ले छोले-भटुरे

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये(madhya pradesh) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने दमदाररित्या पुन्हा सत्तेत पुनरागमन केले आहे. मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी १६३ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या खात्यात केवळ ६६ जागा आल्या. मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे कमळ फुलले आणि दीर्घकाळच्या निवडणुकीच्या धावपळीनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सोमवारी संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले.

सीएम शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे यात ते आपल्या कुटुंबियांसह रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसत आहे. सीएम शिवराज सिंह आपली पत्नी आणि दोन मुलांसह एमपीनगर येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दिसले. रेस्टॉरंटमधून बाहेर निघून सीएम शिवराज सिंह म्हणाले की मला लोकांमध्ये चांगले वाटले. आम्ही संपूर्ण कुटुंब एक आहोत. मला आनंद आहे की जेवण करताना मला लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

 

सीएम शिवराज सिंह भोपाळच्या एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. ते म्हणाले, कधी-कधी अशा पद्धतीने बाहेर पडायला चांगले वाटते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिले की आयुष्यात खूप धावपळ आहे मात्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुटुंबासोबत काही क्षण घालवावेत. आठवणींना उजाळा द्यावा. हे अनमोल मोती आहे जे आपले जीवन उजळून टाकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -