Rahul Narvekar : बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं!

राहुल नार्वेकरांचा संजय राऊतसह आदित्य ठाकरेंना टोला


सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे हे कायम सत्ताधारी सरकार पडण्याची भाषा करत असतात. त्यांनी दिलेल्या वेळा निघून गेल्या तरी सरकारला अजून कोणताही धोका पोहोचलेला नाही. मात्र, त्यांच्या टीका सुरुच असतात. यावरुन आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी संजय राऊतसह आदित्य ठाकरेंना चांगलेच खडे बोल सुनावले. 'सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये', असा टोला राहुल नार्वेकरांनी लगावला आहे.


राहुल नार्वेकर म्हणाले, सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असतं. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडतं. बाहेर कोण बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असं राहुल नार्वेकर म्हणाले.



आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार


आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification) वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण त्यासाठी कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहोचू देणार नाही, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.



आदित्य ठाकरेंनी अशी वक्तव्यं करु नयेत


पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नाही तर विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे अशा प्रकारची वक्तव्यं आदित्य ठाकरेंनी करू नयेत. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावे, अशा प्रकारचं वक्तव्य करत नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्यात असे आपले म्हणणे दिले आहे. परंतु याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाहीत, असे नार्वेकर म्हणाले.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक