मुंबई: विमानातून प्रवास कऱणे कोणाला आवडत नाही. देशातील बरेचसे लोग फ्लाईटने प्रवास यासाठी करतात ज्यामुळे त्यांचा वेळ वाचतो. सोबतच कम्फर्टही मिळतो. आता असा सवाल आहे की हे सुख प्रत्येकाला मिळते का? सागरिका पटनाईक नावाच्या महिलेने विमान प्रवासाचा असा एक फोटो शेअर केला आहे जे पाहून तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडेल.
पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना सागरिकाच्या फ्लाईटमध्ये जे घडले ते हैराण करणारे होते. इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई-६७९८मध्ये प्रवास करत असलेल्या सागरिका पटनाईक यांनी विमानातील प्रवासाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. त्यांना दिलेल्या सीटवरील कुशनचच गायब आहे. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
#Indigo !! #Flight 6E 6798 !! Seat no 10A ! Pune to Nagpur!!! Today’s status … Best way to increase profit 😢😢…Pathetic … pic.twitter.com/tcXHOT6Dr5
— Subrat Patnaik (@Subu_0212) November 25, 2023
टीओईशी बोलकाना सागरिकाचे पती सुब्रत पटनायक यांनी सांगितले की त्यांची पत्नी सुरूवातीला सीट कुशन गायब झाल्याने चांगलीच हैराण झाली. याबाबत तिने केबिन क्रूला ही परिस्थिती सांगितली मात्र त्यावेळेस बोर्डिंगची प्रक्रिया सुरू होती, सागरिका यांना उभे राहावे लागले यामुळे इतर प्रवाशांना त्रास झाला.
वाद होऊ नये साठी क्रूच्या एका सदस्याने दुसऱ्या सीटवरचे अतिरिक्त कुशन आणून सोय कून दिली. सोशल मीडिया एक्सवर सुब्रतने एअरलाईन्सबाबत आपला राग व्यक्त केला. तसेच सवाल केला की या सीटवरील कुशन अचानक गायब कसे होऊ शकतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये हे ही म्हटले की इंडिगोकडून इतक्या निष्काळजीपणाची अपेक्षा नव्हती.
सुब्रत पटनायक यांनी सोशल मीडिया एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. याला इंडिगोकडूनही गांर्भीयाने घेण्यात आले आहे.