नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सोशल मीडिया खाते तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली असून, या प्रकरणात केंद्र सरकार आणि संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Cockroach Janata Party)
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुसाट आणि वेगवान करणाऱ्या 'मुंबई कोस्टल रोड' (Mumbai Coastal Road) प्रकल्पाच्या माध्यमातून आता मुंबईला एक नवी ओळख मिळणार आहे. कोस्टल रोड ...
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर भारतात बंदी घातली होती. याच आदेशाला आव्हान देत दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Cockroach Janata Party)
अभिजीत दीपके हे पूर्वी आम आदमी पार्टीशी संबंधित होते. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर दीपके यांनी १६ मे रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली. (Cockroach Janata Party)
अटलांटा : जगभरात कायद्याचे राज्य आणि नैतिकतेचे धडे देणाऱ्या अमेरिकेतून न्यायव्यवस्थेला आणि खाकी वर्दीला अत्यंत लाजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली ...
पक्षाचा दावा आहे की, तरुणांचा आवाज बुलंद करणे आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र चळवळ उभी करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. अलीकडेच NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात पक्षाने मोहीम सुरू केली असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. (Cockroach Janata Party)






