Friday, May 29, 2026

Nisos Keros Indian Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनी पार करत ‘निसोस केरोस’ जहाज भारताकडे रवाना

Nisos Keros Indian Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनी पार करत ‘निसोस केरोस’ जहाज भारताकडे रवाना

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आणखी एक भारतीय टँकर होर्मुज सामुद्रधुनी पार करण्यात यशस्वी झाला आहे. सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या अनेक वेबसाइट्सनी ही माहिती दिली आहे. (Nisos Keros Indian Ship)

‘निसोस केरोस’ नावाचे हे जहाज विशाखापट्टणमकडे जात असून, ते ३ जूनपर्यंत तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले हे जहाज २१ मे रोजी शारजाहहून रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार ६ वाजता हे जहाज भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील उत्तर अरबी समुद्रात दिसून आले. जहाजांची माहिती ठेवणाऱ्या ‘ऑकविसर’ संस्थेनुसार, विशाखापट्टणमकडे येणाऱ्या ‘निसोस केरोस’ जहाजाची मालकी अरेथुसा शिपिंग कॉर्पोरेशनकडे आहे, तर त्याचे संचालन किक्लेड्स मेरिटाईम कॉर्पोरेशन करत आहे. हे जहाज ३३३ मीटर लांबीचे आहे. (Nisos Keros Indian Ship)

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थाने गुरुवारी (२८ मे) दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने गेल्या २४ तासांत २३ व्यावसायिक जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली. यामध्ये तेलवाहू टँकर आणि कंटेनर जहाजांचाही समावेश होता.या अहवालानुसार, इराणी लष्कराने सांगितले की सर्व जहाजांची हालचाल आयआरजीसी अधिकाऱ्यांशी औपचारिक समन्वय साधल्यानंतरच करण्यात आली. मात्र, होर्मुजमधून जाण्यासाठी जहाजांकडून कोणताही टोल आकारण्यात आला का, हे स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी इराणने होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून टोल आकारण्याची शक्यता व्यक्त केली होती. (Nisos Keros Indian Ship)

याच महिन्यात इराणने सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ नावाची नवी एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इराणकडे होर्मुज सामुद्रधुनीतील मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. (Nisos Keros Indian Ship)

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त बॉम्बहल्ले केल्यानंतर इराणने या मार्गात सागरी बारूदी सुरंग पेरल्याचा आणि काही जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील मुक्त वाहतूक पुन्हा सुरू करणे हा इराण युद्ध समाप्तीच्या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी म्हटले की, “होर्मुज सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली राहील.” इराणच्या कारवाईमुळे जगातील सुमारे २० टक्के गॅस आणि तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, कारण हा मोठा पुरवठा याच मार्गातून केला जातो. त्यामुळे जागतिक ऊर्जा आणि आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. (Nisos Keros Indian Ship)

दरम्यान, बुधवारी (२७ मे) डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर ओमानने इराणसोबत होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याबाबत कोणताही करार केला, तर अमेरिका ओमानवर कारवाई करू शकते. ओमान हा देश होर्मुज सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला इराणसमोर स्थित आहे. (Nisos Keros Indian Ship)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >