सोलापूरहल डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाली होती. बसमधून जवळपास १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहरा जवळ असलेल्या उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटला आणि चाक निखळला. जॉईंट तुटल्याने धावती बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला.
धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताची भीषणता मोठी होती, धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताठिकाणी दाखल झाले आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…