Uttarkashi tunnel collapsed : अरेरे! उत्तरकाशीतील त्या मजुरांच्या बचावकार्यास होणार विलंब; ऑगर मशीनमध्ये बिघाड

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapsed) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून अडकलेले ४१ मजूर अजूनही अडकूनच आहेत. आज बाराव्या दिवशीही त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आज कामगार बाहेर येतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बचावकार्यास काहीसा विलंब होणार आहे.


कामगारांना उपचारांसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बोगद्यात ५१ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ १२ मीटरचे अंतर उरले आहे. अशा परिस्थितीत कामगार लवकरच त्यातून बाहेर पडतील, अशी आशा आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान आज चांगली बातमी येऊ शकते. मात्र, त्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे ७ तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थितीत आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. काही वेळात तज्ज्ञांची टीम येईल. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह उत्तरकाशीला येणार आहेत. मंत्री दिल्लीहून तंत्रज्ञ टीमसह येथे पोहोचतील. सध्या काही काळ बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधलेल्या मंदिरात प्रार्थना केली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी मुख्यमंत्री पुष्कर धामी (CM Pushkar Dhami) यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न, औषधी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याबाबत माहिती घेतली.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे