Health: थंडीत नाही पडणार आजारी, तुमच्या डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला की फ्लू, सर्दीसारखे इन्फेक्शन वाढू लागतात. याचे कारण ऋतू बदलण्यासोबतच आपली रोगप्रतिकारक क्षमता(immunity) कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता. यासाठीच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे असते. जर एखाद्याची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर त्याला योग्य प्रकारचे डाएट घेणे गरजेचे असते.


इम्युनिटी वाढवण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असेल तर खालील दिलेल्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करा.



आले आणि लसूण


आले आणि लसणीमुळे केवळ पदार्थाचा स्वादच वाढत नाही. तर यामुळे सुपर अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणांमुळे आरोग्य सुधारते.



काळी मिरी


काळी मिरी हा सगळ्यात चांगला मसाल आहे. याला काळे सोनेही म्हटले जाते यामुळे केवळ जेवण स्वादिष्टच बनत नाही तर शरीरात उष्णता वाढवण्याचे काम करते. काळी मिरीमुळे इम्युनिटी सुधारण्यास मदत होते.



आंबट फळे


प्रत्येक फळामध्ये व्हिटामिन सी, फायबर, अँटी ऑक्सिडंट, मिनरल्स आणि एन्झाईम भरपूर असतात जे आजाराविरोधात लढण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. तसेच पचनही व्यवस्थित होते. आंबट फळांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.



मांस आणि मच्छी


मांस आणि मच्छीमध्ये प्रोटीन, व्हिटामिन बी, झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात आरबीसी आणि डब्लूबीसी काऊंट वाढतो. यामुळे शरीरास सुरक्षा मिळते तसेच इम्युनिटीही वाढते.

Comments
Add Comment

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सिडकोने केली घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट, जाणून घ्या सविस्तर

नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे

चेंबूरमधील हंडोरेंच्या बालेकिल्ल्याला आरक्षणाचा फटका, हंडोरे कुटुंबाशिवाय असणार काँगेसचा उमेदवार?

शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधी मुंबई (सचिन धानजी): मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच

विक्रमगडमधील १५० आदिवासी मुलांनी अनुभवली मुंबई; सनदी तसेच आयपीएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी): आजवर कधीही रेल्वेने प्रवास न केलेल्या आणि मुंबईही न पाहिलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड

भटक्या कुत्र्यांच्या संख्येची अचूक माहिती महापालिका ठेवणार

संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील भटक्या श्वानांच्या

शिउबाठाला मोठा धक्का! ऐन निवडणूकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांचा राम राम

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान