Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीNana Patekar : ...आणि नाना पाटेकरांनी 'भैय्या' ला दाखवला काशीचा घाट!

Nana Patekar : …आणि नाना पाटेकरांनी ‘भैय्या’ ला दाखवला काशीचा घाट!

नानांना राग झाला अनावर

उत्तरप्रदेश : नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या अनेक गंभीर तसेच विनोदी अशा दोन्ही भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते समाजसेवेसाठीही (Social Work) कार्यरत असतात. नाना त्यांच्या रोखठोक आणि सडेतोड बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात नानांना राग किती अनावर होऊ शकतो, हे स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) नाना सीनसाठी रेडी झालेले दिसत आहेत. मात्र, शूटदरम्यानच एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी काढायला येतो. त्याला सेल्फी देण्याऐवजी नाना रागाच्या भरात त्याला एक लगावतात. शूटचं युनिट त्या चाहत्याला तिथून बाहेर काढतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

नाना पाटेकर हे सध्या उत्तर प्रदेशातील काशी येथे शुटींग करत आहेत. वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर नाना सध्या त्यांच्या जर्नी (Journey) चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहेत. या ठिकाणी हा किस्सा घडला. या सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -