Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीVisa: दिवाळी संपताच करू शकता स्वस्तात परदेशी जाण्याचे प्लानिंग, इतक्या कमी पैशात...

Visa: दिवाळी संपताच करू शकता स्वस्तात परदेशी जाण्याचे प्लानिंग, इतक्या कमी पैशात मिळतोय व्हिसा

मुंबई: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एकदातरी परदेशी जाण्याची इच्छा असते. दरम्यान, अनेकदा परदेशी जाण्याच्या आड येते ते न परवडणारे बजेट. यात कारणामुळे अनेकदा लोकांना आपली इच्छा मारावी लागते. तसेच इतकंच नव्हे तर दुसऱ्या देशात जाण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे व्हिसा. कारण मोठ्या देशांमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.

बजेटमध्ये परदेश प्रवास

येथे आम्ही तुम्हाला असे काही देश सांगणार आहेत जिथे जाण्यासाठी व्हिसाची रक्कम फारशी नाही. या देशांसाठी पाच हजाराहून कमी व्हिसाची रक्कम आहे. यामुळे पैशांची बचत होण्यास मदत मिळेल. मालदीव हे असे ठिकाण आहे जे त्याच्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. दरम्यान भारतीय नागरिकांसाठी मलदीवमध्ये आल्यावर ९० दिवसांसाठी निशुल्क व्हिसा दिला जातो. जर तुम्हाला यापेक्षा जास्त दिवस राहायचे असेल तर त्यासाठी ३,७३३ रूपये विस्तार शुल्क आहे.

३ हजारांत मिळतोय व्हिसा

मलेशिया देशही अतिशय सांस्कृतिक तसेच आधुनिक शहरांनी परिपूर्ण तसेच तेथील स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी ओळखला जाते. भारतातील पर्यटक येथे साडेतीन हजारात ई व्हिसा मिळवू शकतात. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांसाठी हा व्हिसा वेगवेगळा असतो. इंडोनेशिया हे बेटही अतिशय प्रससिद्ध आहे. येथे भारतीय पर्यटक २,७१५ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकतात.

सिंगापूर देशही पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येथे भारतीय पर्यटक १,८३१ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकतात. व्हिएतनामध्ये जाण्यासाठी भारतीय पर्यटक २,०७८ रूपयांत ई व्हिसा मिळवू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -