विरारमध्ये पाण्यासाठी शेकडो नागरिक पुन्हा रस्त्यावर, भव्य मोर्चा

‘दिवाळीपूर्वी योजनेचे उद्घाटन करा, अन्यथा उपोषण’


विरार : वसई - विरारला १८५ एमएलडी पाणी देण्यासाठी एमएमआरडीएकडून तयार झालेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे दिवाळीच्या आत उद्घाटन करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी रविवारी विरारमधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या दिवाळीपूर्वी या योजनेचे उद्घाटन करा नाही तर नाइलाजास्तव १५ नोव्हेंबरनंतर यासाठी आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असे ‘पाणी हक्क आंदोलना’चे प्रमुख नेते मयुरेश वाघ यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे या पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी आता पाणी हक्क आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.


विरार पश्चिमेच्या विविध भागांतील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी मयुरेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरून सूर्या पाणी योजनेचे रखडलेले उद्घाटन करण्याची मागणी केली. कोणीही श्रेय घ्यावे, पण जनतेला पाणी द्यावे व लवकरात लवकर सूर्या योजनेचे उद्घाटन करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. विरारच्या बायपास रस्त्यावरून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप पेट्रोल पंम्प येथे झाला. त्यात शेकडो महिला - पुरुष, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.


आम्ही सतत पाठपुरावा करून पाणी योजनेचे काम पूर्ण करून घेतले आहे, त्यानंतर पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी सरकार दरबारी पण पाठपुरावा करीत आहोत आणि रस्त्यावर संघर्ष करून जनतेच्या तीव्र भावनाही सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवित आहोत. पाण्यासाठी लोक तहानलेले आहेत. दिवाळीपूर्वी पाणी योजनेचे लोकार्पण करून सूर्याचे पाणी लोकांना सुरू करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू आणि आपण १५ नोव्हेंबरनंतर आमरण उपोषण करणार, असे वाघ यांनी जाहीर केले. यास हजारो लोकांनी समर्थन दिले असून, आम्हीही आमरण उपोषणाला बसणार असे महिला - पुरुष कार्यकर्त्यांनी या मोर्चात सांगितले.


नुकतेच खा. गावित, वाघ यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाणी योजनेचे उद्घाटन करण्याबाबत निवेदन दिले आहे.




  • २०१७ पासून सुरू झालेले सूर्या पाणी योजनेचे काम खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक व मयुरेश वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मार्गी लागले असून, योजनेचे काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यात पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे, पण आतापर्यंत योजनेचे उद्घाटन झालेले नाही.

  • विरार पश्चिमेच्या विविध भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक, विशेषतः महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पाणी देण्याची रविवारच्या आंदोलनात मागणी केली. रविवारी सकाळी १२ वाजता आंदोलनाची हाक देऊन सायंकाळी शेकडो लोक रस्त्यावर उतरून उत्स्फूर्तपणे हे आंदोलन झाले.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा